
थोर महानयिकांचा संयुक्त जयंती सोहळा संपन्न
नवी मुंबई - कोपरखैरणे गाव सेक्टर १९ येथील धम्मशील बुद्धविहार सेवासमीती अंतर्गत महीला मंडळाच्यावतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री, त्यागमुर्ती रमाई या थोर महानायीकांचा संयुक्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सकाळच्या सत्रात वैद्यकीय अधिकारी नरेश मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते. सदर शिबीराचा परिसरातील लोकांनी खुप मोठया प्रमाणात लाभ घेतला.
सायंकाळच्या सत्रात कोपरखैरणे गावचे स्थानिक माजी स्थायी समिती सभापती तथा मा. नगरसेवक शिवराम पाटील, आरपीआय आठवले गटाचे नेते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिद्राम ओहोळ, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे , उपाध्यक्ष युवराज मोरे, कार्याध्यक्ष विजय कांबळे युवक आघाडी, सरचिटणीस
एल.आर. गायकवाड, सचिव संतोष ढेपे, रिपब्लिकन सेना नवी मुंबई उपाध्यक्ष मा. नंदकुमार भालेराव, पर्यटन सचिव नवी मुंबई भारतीय बौद्ध महासभा मा. नामदेव जगताप इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि 'संवाद हा नात्यांचा' या काव्य संवाद कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व आयोजकांच्या आगळ्यावेगळ्या नियोजनाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले आणि कवी मान्यवरांना दाद दिली. सदर कार्यक्रमाच्या नियोजनात सेवा समीतीचे संस्थापक व अध्यक्ष संजय गायकवाड, उपाध्यक्ष व्दारकानाथ जगताप, उपसचिव मुकूंद सोनकांबळे, हिशेब तपासणीस हरिश्चंद्र सोनावणे यांनी विशेष योगदान दिले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचलन संगिता गायकवाड आणि संगिता सोनावणे यांनी केले तर विमल सोंनकांबळे, रेखा कांबळे, सुनंदा गायकवाड, सुनीता काळे, व्दारका माघाडे, कमल कांबळे, अनिता सुर्यवंशी, सुमन चव्हाण, कांता जगताप, अंजना गायकवाड, लता तायडे, कविता भंडारे, सरिता सोनावणे, प्रभाव ती सोनावणे, उर्मिला भोईर,बेबीताई सोनावणे , वैशाली गायकवाड, शकुंतला साळवे यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम