महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,नवी मुंबई ,कार्यकारणीत पत्रकारांचा समावेश !

कर्तव्यदक्ष ,वाहतूक पोलीस श्री बांडे यांच्या हस्ते पत्रकारांना दिले नियुक्तीपत्र

नवी मुंबई -कोपर ,खैरणे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वाहतूक  ,पोलीस कर्मचारी ,श्रीयुक्त बांडे  यांच्या हस्ते ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या पत्रकारांना ,नियुक्ती  पत्र ,देण्याचा कार्यक्रम कोपरखैरणे विभागात मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला नवनिर्वाचित  पदभार ,स्वीकारलेल्या पत्रकारांनी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी ,बांडे यांच्या हस्ते ,नियुक्तीपत्र स्वीकारताना मोठा आनंद व्यक्त केला ,

वाहतूक पोलीस कर्मचारी बांडे हे अत्यंत प्रमाणिक कर्तव्यनिष्ठ ,अधिकारी असल्या कारणाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र ,हा एक अनोखा योगायोग आहे ,अशी भावना पत्रकारांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना ,व्यक्त केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई ,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण ,यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाची ,यशस्वी  घोडदौड सुरू असून कोणत्याही ,कलंकित आणि बोगस पत्रकाराला ,कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्रकार संघटनेचा ,सभासद बनवता येणार नाही जे श्रमिक कष्टकरी पत्रकार आहेत कोणत्या तरी वर्तमानपत्रात प्रमाणिक कार्यरत आहेत ,अशा पत्रकारांना सोबत घेऊन संघटनेचे कामकाज केले जाईल ,आणि त्यांनाच संघटनेचे सदस्यत्वपद देण्यात येईल ,कार्यरत असलेल्या अशा पत्रकारांनी ,पत्रकार  संघटनेशी संपर्क साधून संघटना वाढवण्यासाठी ,एकत्र येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढावे असे आव्हान देखील पत्रकार चव्हाण यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केलेले आहे

दरम्यान : यावेळी महाराष्ट्र गुन्हा साप्ताहिकाचे पत्रकार  अस्तेअलम मिर  यांची पत्रकार संघटनेच्या ,खजिनदार पदी नियुक्ती केली असून,सल्लागारपदी कुंडलिक कानगुडे ,सचिव पदी दिलीप म्हात्रे कार्याध्यक्षपदी अशोक काळे ,यांची निवड करण्यात आलेली आहे

या निवडी दरम्यान कोकण प्रदेश कार्याध्यक्ष ,सावधान महाराष्ट्र ,या वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र बोडके, पत्रकार सुनील गायकवाड ते देखील उपस्थित होते

संबंधित पोस्ट