घनसोली रुपश्री विद्यालयात शाळेकरी विद्यार्थ्यांनी भरवला आठवडे बाजार ! बाजारात शिक्षक आणि पालकांचा मोठा सहभाग !
नवी मुंबई - शालेय शिक्षण घेत असताना मुलांना व्यवहारी ज्ञानाची जाणीव असावी यासाठी रुपश्री विद्यालय घनसोली या विद्यालयात शुक्रवारी आठवडे बाजार हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला
शाळेच्या परिसरामध्ये आठवडे बाजाराचे स्वरूप निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते जणू काही आपण इतरत्र आणि ग्रामीण भागा मध्ये होणाऱ्या आठवडे बाजारामध्ये आलो आहोत की काय? इतके छान बोलके चित्र रुपश्री शाळेच्या परिसरात , विद्यार्थ्यांनी निर्माण केले होते
विद्यार्थ्यांनी लावलेल्या आठवडे बाजारात विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मुलांच्या आनंदात भर घातली या आठवड्या बाजारा मध्ये मुलांनी वडापाव, पाणीपुरी, पालेभाज्या , स्त्रियांना लागणारे विविध प्रकारचे अलंकार खेळणे व दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या अशा कितीतरी प्रकारच्याबा बाजारात विक्री करणाऱ्या चीज वस्तू ठेवून ग्राहक वर्गाला आकर्षण वाटेल इतक्या सुंदर, पद्धतीने आठवडे बाजाराची मांडणी केली होती
या बाजारात , आपल्या वस्तू विक्री करणारे इयत्ता ६ ते ७ चे विद्यार्थी आणि त्यांचेी शाळेकरी मित्र हे ग्राहक रुपी एखाद्या कसलेल्या आणि मुरलेल्या व्यापारा सारखे आपल्या वस्तूचे भाव , ठरवताना आणि करताना दिसत होते.या उपक्रमात इयत्ता ६ ते ७ वर्गात शिकणारे मराठी आणि इंग्रजी माध्यमाची विद्यार्थी सहभागी झाले होते ,
यात एकूण ४० लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्व कष्टाने कमवलेल्या पैशाचा, मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता
दरम्यान या आठवडे बाजारामध्ये मुलींनी आणलेल्या साडी विक्रीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि या बाजाराचे खरे आकर्षण साडी विक्री चे ठरले बाल वयामध्येच विद्यार्थ्यांना आपल्या व्यवहारी ज्ञानाची जाणीव करून देणारा आज शालेय उपक्रम खरोखर अभिनंदनीय आहे , याची चर्चा सर्वत्र रस्त्यामध्ये येणारे जाणारे नागरिक करताना दिसत होते
विद्यार्थ्यांना , त्यांच्या शालेय जीवनातून खरेदी विक्री नफा तोटा, व्यवहार ज्ञान, विक्री कला , या संकल्पनेचा , अनुभव देण्यासाठी , आठवडा बाजार हा उपक्रम राबविण्यात आला
मुख्याध्यापक यादव शेळके
,
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम