प्रजासत्ताक दिनी चेतना क्लिनिकचा अभिनव उपक्रम चित्रकलाद्वारे भारतीय संविधानाची ओळख

नवी मुंबई - भारत देशामध्ये गणतंत्र दिवस सर्व भारतीय नागरिक अतिउत्साहात साजरा करत असतात परंतु या दिनाचे काय महत्व आहे ?

हे सांगण्यास बहुसंख्य भारतीय नागरिक कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गणतंत्र प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी देशभक्ती गीते लावली जातात किंवा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मात्र ज्या दिवशी भारत देश प्रजासत्ताक झाला त्याचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम किंचितच कुठेतरी  राबविले जातात ही वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीला छेद देऊन रक्ष्मणीबेन खनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रजासत्ताक दिनी कोपरखैरणे विभागातील तब्बल ४०० विद्यार्थ्यांना एकत्र करून भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणारे चित्ररूपी चित्रकला स्पर्धचे आयोजन केले होते 

त्यात भारतीय राज्यघटना भारतीय संसद, भारतीय संसदेचे कायदे राज्यघटनेचे कलम, राज्यघटनेचे शिल्पकार , मसुदा परिषद, राज्यघटनेचे अध्यक्ष, व राज्य घटना दरम्यान झालेल्या विविध चर्चा या संदर्भात बोलके चित्र काढून भारतीय राज्यघटने संदर्भात जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम चेतना क्लिनिक च्या वतीने अति उत्साहात राबविण्यात आला. 

या चित्रकला प्रदर्शनात महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेला विविध अंगी चित्रांद्वारे रेखाटून संविधानाची महंती  सांगणारी बोलकी चित्रे सहजरीत्या सर्वसामान्य माणसाला समजून येतील अशा प्रकारचे चित्रकला विद्यार्थ्यांनी साजरी करून नागरिकांचे लक्ष वेधले

या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन संविधान साक्षर जागृती चित्रकला स्पर्धेमध्ये  निवृत्त न्यायाधीश शरद पाटील व काही तज्ञ वकिलांनी देखील उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रजासत्ता दिन साजरा करत असताना राज्यघटनेचे महत्व हे नागरिकांना कळायला हवे  सविधान जनजागृती झाली पाहिजे यासाठीच या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर मुकेश चंद्रा यांनी दिली

या चित्रकला स्पर्धेमध्ये वय वर्ष ४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता

या कार्यमाला प्रमुख पाहुणे माजी धर्मदाय आयुक्त तसेच वर्धा जिल्ह्याचे माजी जिल्हा न्यायाधीश श्री. शरदकुमार पाटील, नगरसेवक श्री. लिलाधर नाईक, समाजसेवक श्री. भरत नाईक, समाजसेवक श्री. संतोष नाईक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण प्रदेशचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र बोडके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवी मुंबईचे अध्यक्ष श्री. दशरथ चव्हाण, महाराष्ट्र गुन्हे तपासचे संपादक श्री. संजय वि. नरवडे, महाराष्ट्र गुन्हे तपासचे पत्रकार  अस्ते आलम मीर (राजु), पत्रकार  सुनिल गायकवाड उपस्थित होते.

संबंधित पोस्ट