ठाण्यात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा होणार! विकास गायकवाड यांची माहिती
नवी मुंबई -पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीमुळे संपूर्ण राज्यातील फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्मभूमी मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात येईल अशी माहिती ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी दिलेली आहे
प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी व एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता शहरात दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हा महामेळावा यशस्वी करतील असा विश्वास विकास गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे
दरम्यान पीपल्स रिपब्लिकन पार्टी (ठाणे जिल्हा) च्या वतीने एक महत्वपूर्ण आढावा बैठक पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शन पार पडली.
या प्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला
पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले.या नंतर ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भीमशक्ती व शिवशक्तीचा गजर करण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोष प्रसंगी बाळासाहेबाचे शिवसेना या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.
यावेळी जयदीपभाई कवाडे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारमध्ये बहुजन समाजाला न्याय मिळाला नाही. मात्र या महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भीमशक्ती व शिवशक्तीचा नारा दिला असून स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकींना समोरच जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला या महायुतीतून एक नवी दिशा मिळाली आहे. भीमशक्ती शिवशक्ती च्या एकत्रितरणातून बहुजन समाजाला बळ मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकत्रित कार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी पी.आर.पी चे ,जेष्ठ नेते महिंद्र पवार,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जया रिझवानी, शहर कार्याध्यक्ष ज्योतीताई साबळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम