माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचे दुःखद निधन अंत्यविधीला दिग्गज नेते उपस्थित...

नवी मुंबई : रिपब्लिकन जेष्ट नेते, माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचे दि. २६ जाने.२०२३ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.  अंत्यविधी संध्याकाळी ६.३० वा. तुर्भे स्मशानभूमी येथे करण्यात आला. 

अंतयात्रेस केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, रिपाइं एकतावादी चे नाना इंदिसे, मा. मंत्री अविनाश महातेकर, काँग्रेसचे मा. आमदार चंद्रकांत हांडोरे, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, राष्ट्रवादीचे काकासाहेब खंबाळकर, शिंदे गटाचे  आमदार राम पंडागळे, सुरेश बारशिंगे, एडवोकेट सदावर्ते, तानसेन ननावरे, दयाल बहादुरे, गौतम सोनवणे, सिद्राम ओहोळ,  अशोक गायकवाड, चंद्रकांत जगताप, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, एल. आर. गायकवाड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकला जाधव, महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई बोदडे यांच्यासह शेकडो महिला पुरुष, युवक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

कालकथित सुमंतराव गायकवाड यांनी मुंबईच्या लेबर कॅम्प येथून नगरसेवक ते आमदारकी पर्यंतची  अनेक पदे भूषवली. आठवले यांचे स्वीय सहाय्यक, तसेच आरपी आय आठवले गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवी मुंबई जिल्हा निरीक्षक या जबाबदाऱ्या पार पाडल्या. राजकारणात परखड मत मांडून आरपीआयची बुलंद तोफ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. चळवळीतील संघर्षमय जीवनाचा प्रवास करणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्याला उपस्थित नेतेगणांनी थोडक्यात आपले अनुभव कथन करून आदरांजली वाहिली. सध्या त्यांचा परिवार वाशी येथे राहत असून त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, व तीन नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट