कोपरखैरणे प्रभाग अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम संपन्न !
नवी मुंबई : देशामध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहीम सर्वे अंतर्गत मागील २०२२या वर्षी नवी मुंबई महानगरपालिका देश पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आली होती
महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई महानगरपालिका सलग प्रथम क्रमांकात येऊन बहुमान प्राप्त केलेली राज्यातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे
दर वर्षाप्रमाणे सुरू असलेल्या २०२३ च्या दरम्यानची स्वच्छता सर्वे मोहीम सुरू झाली असून त्या मध्ये नवी मुंबई महानगरपालिका देखील सलाबादप्रमाणे सहभागी .
२०२३ स्वच्छता सर्वे मोहीम वर नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये प्रथम बहुमान पटकविण्याचा उद्देशाने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून कंबर कसली आहे.
निश्चय केला नंबर पहिला! हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून कोपरखैरणे प्रभाग समिती अंतर्गत दिनांक २१ /१/ २०२३ या दिवशी स्वच्छता कार्मिनच्या सन्मानार्थ सकाळी ७ ते १० च्या दरम्यान लोकसभातून एक विषय स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.या मोहिमेमध्ये नागरिकासह पालिका अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतला
दरम्यान :कोपरखैरणे प्रभाग अंतर्गत झालेल्या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विभाग अधिकारी सागर मोरे, माजी विभाग अधिकारी प्रशांत गावडे ,स्वच्छता अधिकारी दिनेश वाघुळदे, उपअभियंता शामराव शिरतोडे,पालिका अधिकारी गणेश आघाव,व फार्म सोसायटीतील सर्व पदाधिकारी व नागरिकाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून आले
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम