पत्रकार योगेश लबडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा पुरस्काराने सन्मानित !

नवी मुबई :दि २०जानेवारी रोजी अकोला येथील जानोरकर सभागृहात अकोला येथे नववे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन २०२३ पार पडले. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा पुरस्काराने देवरी येथील समाजसेवक व पत्रकार योगेश लबडे 

यांची रुग्णसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी वेरुकर गुरुजी, प्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज, संमेलनाध्यक्ष चंदुभाऊ पाटील माकनवार, डाक्टर सचिन म्हैसने, आमदार अमोल मिटकरी, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, संपादक किरण अग्रवाल, जावेद पाशा, गजानन नारे, कृष्णा अंधारे, संतोष हुसे, गुनवंत जानोरकार, सचिन बुरघाटे, सभापती हरिदिनी वाघोडे उपस्थित होते. कृष्णा पखाले, विषेश आभार सचिन माहोकार, मयुर वानखडे केले. 

पत्रकार समाजसेवक योगेश भाऊ लबडे यांना वर्षाच्या पहिल्याच महिण्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश भाऊ लबडे यांच्यावर त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

सच्चा रुग्णसेवक म्हणूनही  कार्य..! 

अर्ध्या रात्री धावून जाणारा एक युवक अशी त्यांची ख्याती आहे. अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागात आरोग्य विषयी मोठी जनजागृती  करून त्यांनी युवकांना याकामी प्रोत्साहित  केले.  आरोग्य शिबिरे, रक्तदान,  स्वच्छता, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती 

सामाजिक, अंधश्रद्धा निर्मूलन, यासारख्या राष्ट्रीय कार्यात आधी उपक्रमातही ते अग्रक्रमाने पुढे असतात.   एका अनाथ मुलीचे आत्याचे सहकाऱ्यांने त्यांनी लग्नही लावून तिचा संसारही थाटवून दिला. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातही अग्रेसर आहेत.

संबंधित पोस्ट