जयंती निमित्त बाळासाहेबांना विनम्र अभिवादन किशोर पाटकर यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी मुबई :बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा यांच्यावतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य अश्या विनम्र अभिवादन सोहळ्याचे आयोजन १८ जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आले होते.


बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या सन २०२३ च्या दैनंदिनीचे प्रकाशन, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्यासोबत त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या सर्व गटातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्टेजवरून खाली उतरून ज्येष्ठ शिवसैनिकांचा त्यांच्या जवळ जाऊन सन्मानपत्र देऊन सत्कार केला याशिवाय पुनर्विकास प्रक्रियेतील लाभार्थींना त्यांच्या नव्या घराचे पी-एएए करारपत्र दस्तऐवज वितरण करण्यात आले. 

सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची आज ओळख आहे. त्यानुसार मध्यमवर्गीयांसाठी सिडको ने बांधलेली घरे जवळजवळ ४० वर्षे होऊन जीर्ण स्वरूपाची झाली परंतु पुनर्विकास प्रक्रियेची सिडकोने कोणतीच दाखल घेतली नव्हती. तत्कालीन सत्ताधाऱ्यांची खोटी आश्वासने याशिवाय आर टी द्वारे जनतेची दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात शेवटी या लढ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी मा. नगरसेवक किशोर पाटकर यांनी पुढाकार घेऊन गेली बावीस वर्षे हा लढा दिला, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विजय नाहटा यांची पोलादी साथ लाभल्याने त्याची फलश्रुती म्हणून आठ सोसायटीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले दहा ते बारा मजले तयार झाले असून २२०० लाभार्थींना स्टॅम्पड्युटी भरून घराचे दस्तऐवज अर्थात मालकी हक्क प्रदान करण्यात आला. 

" पस्तीस हजार रुपयांचे घर आज दीड कोटीच्या घरात गेले असल्याने त्याचा फायदा कौटुंबिक आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी होईल "

सदर कार्यक्रमाचे आयोजन उपनेते विजय नाहटा यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा-प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांनी केले.

संबंधित पोस्ट