नवी मुंबईत युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन
नवी मुंबई :युवा सेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नेरूळगाव येथील शिवसेना शाखा क्र.९३ व क्र.९५ शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार राजन विचारे, आप्पा पराडकर, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक नेरूळ विभाग प्रमुख लक्ष्मण पोपळघाट यांच्यासह शाखाप्रमुख (क्र.९३) केतन काळे व विशाल ताम्हाणे, (क्र ९५) शाखा प्रमुख गणेश राऊत, उपविभाग प्रमुख तेजस म्हात्रे, महिला शाखा संघटक सीमा राजगुरू, विभाग संघटक मनीषा कंबोज, उपविभाग संघटक संगीता राजगुरू, युवासेना शाखा अधिकारी (क्र ९३) अभिषेक तेलंग, शाखा अधिकारी (क्र ९५) प्रवीण यादव आदींसह नवी मुंबईतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने कंबर कसली असून विरोधकांनी त्याचा धसका घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम