कोपरखैरण्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे वाहन चालकांना मोफत चष्मे वाटपाचे आयोजन!

नवी मुंबई :वाहन चालकाकडून चष्मे अभावी अनेक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोपरखैरणे विभागात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालकासाठी लायसन्स दाखवा आणि चष्मे घेऊन जा या अभिनव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 

या शिबिराद्वारे वाहन चालकांचे मोफत डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देखील देण्यात आले

या शिबिरामध्ये तब्बल अकराशे वाहन चालकांनी नेत्र तपासणी करून  या शिबिरात सहभाग घेतला  नवी मुंबई युवा संपर्कप्रमुख सुरज गायकवाड उपशहर प्रमुख मयूर चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून  युवा सेना संपर्कप्रमुख  अमित चौगुले, नवी मुंबई शहर प्रमुख सुरेश भिलारे यांचे मार्गदर्शन लाभले

या शिबिरामध्ये जिल्हा संघटक शितलताई कचरे उपशहर संघटक उज्वला यादव संघटक  विभाग संघटक स्वाती दळवी, माजी नगरसेवक रामदास पवळे सह संपर्कप्रमुख नवी मुंबई जिल्हा सचिन कांबळे, सोनू जोशी  उपशहर प्रमुख ,गणेश इंगळे उपजिल्हाप्रमुख (युवा सेना )चेतन पाटील (युवासेना) शहर प्रमुख सूर्यकांत कचरे विभाग प्रमुख कोपरखैरणे विभाग इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित शिबिराचे आयोजन करण्यात आले

दरम्यान या शिबिरात तज्ञ नेत्र चिकित्सक डॉक्टर ज्ञानेश कानडे व त्यांच्या संपूर्ण टीमने सहभाग नोंदवून कोपरखैरणे विभागातील वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी  करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यासाठी सहकार्य केले 

कार्यक्रमाला  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण महाराष्ट्र राज्य मराठी पत्र संघाचे नवी मुंबई कार्याध्यक्ष दिनकर गायकर ,पत्रकार राजू,  मीर , पत्रकार राजेश उपाध्याय ,पत्रकार सुनील गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

संबंधित पोस्ट