पत्रकारांनी पत्रकारिता योग्य दिशेने चालवल्यास समाज माध्यमांमध्ये नक्कीच बदल घडेल ! पी आय गजानन कदम यांचे प्रतिपादन!
- by Reporter
- Jan 09, 2023
- 248 views
नवी मुंबई (प्रतिनिधी) समाज माध्यमांमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी आपली लेखणी न्याय हक्काच्या लढाईसाठी सातत्याने तेवत ठेवली तरच समाज माध्यमांमध्ये बदल घडण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही किंवा वेळ लागणार नाही त्यासाठी पत्रकारांनी शोध पत्रिका करून सत्याची भूमिका मांडावी असे मत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पीआय गजानन कदम यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारासमोर बोलताना व्यक्त केले
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला गजानन कदम यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात महाराष्ट्र गुन्हे तपास या साप्ताहिकाचे संपादक सुभाष जाधव,पत्रकार सुनील गायकवाड पत्रकार अरुण बिराजदार, यांनी देखील पत्रकारांच्या समस्या बाबतीत आपले मत व्यक्त केले.
दरम्यान : या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण, पत्रकार दिलीप लांडे, पत्रकार राजू मिर, पत्रकार वामन चव्हाण, पत्रकार प्रशांत ससाणे, दिलीप म्हात्रे, संतोष म्हात्रे, सतीश कोळी, योगेश चोरट, मोटार ट्रेनिंग स्कूल नवी मुंबई असोशियनचे अध्यक्ष मधुकर पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सावधान महाराष्ट्र या साप्ताहिकाचे संपादक राजेंद्र बोडके व उपसंपादक कुंडलिक कानगुडे यांनी केले होते कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सूत्रसंचालन राजेंद्र बोडके यांनी केले.
रिपोर्टर