के.डी.एम. प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन व 3 रा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

नवी मुंबई: वर्षभर राबवलेले शैक्षणिक उपक्रम तसेच सह-शालेय उपक्रम यांना पालकांसमोर मांडणे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी के.डी. एम. प्री - प्रायमरी इंग्लिश स्कूल हेडूटणे ता.पनवेल जिल्हा रायगड येथे ३ रा वर्धापन दिन तसेच प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन तसेच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार व भारताच्या महान जादूगार सलोनी यांनी केलेले जादूचे प्रयोगांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमासाठी लाभलेला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे कार्यक्रमाच्या यशाचे गमक होते.

 उपरोक्त कार्यक्रमासाठी शिक्षक आमदार श्री. बाळाराम पाटील साहेब, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्राईम ब्रांच (नवी मुंबई) चे मा. श्री. अर्जुन गरड ,  पनवेलचे मा. सभापती श्री. काशिनाथ पाटील, खारघर फोरमच्या अध्यक्षा आणि मा.नगरसेविका सौ.लिनाताई अर्जुन गरड मॅडम, न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक श्री. सतीश पाटील , कानपोली गावचे सरपंच श्री. मते, युवा उद्योजक श्री. प्रमोद बागल , श्री . भरत जाधव  आणि आमचे मार्गदर्शक व थोर समाजसेवक श्री. सुनीलजी पाटील  या मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली होती. मान्यवरांच्या सन्मानानंतर  झालेल्या मनोगतांतून,विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मान्यवरांनी शाळेच्या भावी काळातील घडामोडींसाठी तसेच वृद्धिसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. शाळेचे संचालक श्री. महादेव क्षीरसागर, शाळेचे विश्वस्त ॲड. श्री. कृष्णांत देवकर आणि प्रा. श्री. दत्तात्रय भापकर यांनी उपस्थितीबद्दल व शुभेच्छांबद्दल मान्यवरांचे आभार व्यक्त केले. 

संबंधित पोस्ट