पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी जया रीजवानी यांची निवड !

नवी मुंबई : पीपल्स रिपब्लिकन  पार्टीमध्ये गेल्या  २२ वर्षापासून  कवाडे यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून काम करणारी श्रीमती जया प्रताप रिजवानी यांची ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे 

ही निवड प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या मान्यतेने ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष व उल्हासनगर महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक प्रमोद टाले यांनी श्रीमती जया प्रताप  रिजवानी यांना नियुक्तीपत्र देऊन केलेली आहे.

जया रिजवानी ह्या सिंधी समाजातल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करत आहेत. यापूर्वी देखील रिजवानी यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आहे  ठाणे शहरात व ठाणे जिल्ह्यामध्ये पक्ष वाढविण्यासाठी जया रिजवानी यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केल्या असल्याकारणाने

जया रिजवानी यांची ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात येत असल्याचे नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांनी सांगितले

या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे महासचिव शंकर जमदाडे, उद्योजक गोविंदराव पाठारे ,ठाणे जिल्हा महिला सचिव कल्पना लाडे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान  जगताप, कल्याण शहर प्रमुख चंदन कांबळे, मुंब्रा शहराध्यक्ष प्रणय घोरपडे, अंबरनाथ महिला शहर प्रमुख निर्मला गौलोद , पत्रकार सुनील गायकवाड यांच्यासह इत्यादी मान्यवर  कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान: महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदे गट प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी ची संयुक्त युती झाल्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून पक्ष वाढण्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत.

संबंधित पोस्ट