महावितरणच्या लाक्षणिक संपाला रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा
नवी मुंबई : रिपब्लिकन सेना सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून महावितरणाच्या संपाला नवी मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे.
एमटीएनएल, एअर इंडिया, भारतीय रेल्वे, जहाज, जेट्टी बंदरे अशा सर्व सरकारी कंपन्या केंद्र सरकार विकायला काढत आहे. "हम दो और हमारे दो" अशी जोड गोळी मोदी-शहा आणि अंबानी- अदानी यांच्या एकत्रिकरणाने देशात खाजगीकरणाची लाट आली आहे. याचा भुर्दंड महागाईद्वारे सामान्य जनतेला भोगावा लागत आहे आणि आता एम. एस. ई. बी. अडानीच्या घशात घालण्याचा या सरकारने घाट घातला आहे.
त्याच्या विरोधात महावितरण द्वारे वाशी सेक्टर 17 येथील कार्यालया समोर निषेध करण्यात येत आहे, या लढ्यामध्ये रिपब्लिकन सेना संपूर्ण ताकदीनिशी आपल्या सोबत उभी आहे असे जिल्हाप्रमुख खाजा पटेल यांनी या मोर्चाचे नेतृत्व करीत असलेले अश्वजीत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना सभेत जाहीर केले.
यावेळी एम. एस. ई. बी. चे नवी मुंबई, पनवेल, भांडुप, कळवा युनिटचे कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अदानी व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम