शिंदे गट आणि प्राध्यापक कवाडे हे एकत्र आल्याने ठाण्यात पीआरपीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त !
नवी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा पक्ष या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन युतीची घोषणा पत्रकार परिषदे दरम्यान केल्याने ठाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या कार्यकर्त्या कडून आनंद व्यक्त केला जात आहे.
प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे आंबेडकरी समाजातील मोठे नेते आहेत त्याचप्रमाणे नामदार एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ठाणे ही त्यांची कर्मभूमी आहे. ठाणे महानगरपालिके क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना येत्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय फायदा होण्याचे संकेत आहेत. ही राजकीय युती ठाणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षाला फलदायक अशा स्वरूपाची ठरू शकते ठाणे महानगर पालिकेवर भगवा आणि निळा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे.
दरम्यान : मुख्यमंत्री शिंदे आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची राजकीय समीकरण जुळल्याने ठाण्यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे लोकसभा प्रभारी महेंद्र पवार, ठाणे जिल्हा सचिव शंकर जमदाडे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या जयाताई रिजवानी, ठाणे शहर सचिव विजय रावजी ठाणे कार्याध्यक्ष ज्योती साबळे, दैवशाला शिंदे , सुशीला बांगर, सुचित्रा स्वामी, सुषमा साळुंखे, महेश जाधव, ठाणे शहर उपाध्यक्ष नितीन जाधव, शांता जाधव, सुनिता गायकवाड , साईनाथ खरात, अनिता मोहिते, विनोद एतुस्कर, रोहिणी पवार, सरुबाई सूर्यवंशी, नीतू देवरे, कल्पना लाडे, पद्मा शेठ, निर्मला मॅडम, चंदन कांबळे, यांनी या युतीबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम