
सावित्रीमाई फुले यांची जयंती संजीवन विद्या मंदिर दिघा येथे साजरी.
नवी मुंबई : सनातनी मानसिकतेच्या विरोधात महिला शिक्षणाचे कवाडे उघडी करत देशामध्ये सर्वप्रथम पाऊल उचलून महिलांच्या शिक्षणाबाबतीत जागृती करून देशात मुलींसाठी पाहिली शाळा सुरू करत नवा आदर्श निर्माण करणारी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई विभागातील ठिकठिकाणी विविध शाळांमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
दिघा येथील संजीवन विद्या मंदिर, पंढरीनगर येथे देखील सावित्रीमाई यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवि पी. ढवळे उपस्थित होते. शाळेतील मुलांनी सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रबोधनपर संभाषण करीत आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानी असलेले रवि ढवळे यांनी उपस्थितांना सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय करुन दिला.
या शाळेमधील शाळेकरी विद्यार्थिनी मुलींनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा करून आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत त्याची प्रचिती करून दिली
दरम्यान:. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया कदम यांनी सुरेख शैलीत केले तर आभार प्रदर्शन अश्विनी गोरे यांनी केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम