मूकनायिका फाउंडेशन तर्फे ठाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विरोधात अमरण उपोषण सुरू!
नवी मुंबई :नवी मुंबई मधील नेरूळ सेक्टर १० या ठिकाणी राहत असलेल्या अन्नपूर्णा गायकवाड यांच्या तक्रारीनुसार नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती-प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपींना जेरबंद करण्यात आलेले नाही आजही आरोपी मोकट असल्याने आरोपी पीडित महिलेला व तिथे राहत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना अश्लील जातिवादक शिवीगाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून होत आहे त्यामुळे त्यांच्या जिवितेल धोका निर्माण होण्याचा संभव आहे
या विरोधात मूक नायिका फाउंडेशन तर्फे ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्याला समोर ३१ डिसेंबर पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे
याबाबत माहिती अशी की नेरूळ या ठिकाणी राहणारे पीडित कुटुंबासोबत इतरही अनुसूचित जाती जमातीचे २० ते २५ कुटुंब वास्तव्यास आहे त्याच सेक्टर २० परिसरात स्थानिक म्हात्रे कुटुंब देखील वास्तव्य आहे नेरुल सेक्टर १० गावदेवी मंदिरासमोर पीडित कुटुंबासह अनुसूचित जाती जमातीचे नागरिक आहेत ते गेल्या २५ वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना म्हात्रे परिवारांनी दहशतीच्या जोरावर दमदाटी करत त्यांना बेघर करण्याचा घाट घातलेला आहे त्यातच त्यांचे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडून टाकलेले आहे. शौचालाची सोय नाही, अशा परिस्थितीमध्ये पीडित कुटुंब व इतर अनुसूचित जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी राहत आहेत
मूकनायिका फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष नीतिका राव यांनी आवाज उठवून ठाणे जिल्हाधिकारी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन, समाज कल्याण अधिकारी यांना वेळोवेळी अनेक प्रकारची निवेदन सादर केली त्यानुसार या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी घेऊन या संदर्भात योग्य विभागीय बैठकीचे आयोजन समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्फत करा अशा सूचना समाज कल्याण अधिकारी समाधान इंगळे यांना दिल्या होत्या
मात्र समाधान इंगळे हे बैठकीला हजर न राहता आपल्या पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप मूक नायिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीतिकाराव यांनी केलेला आहे
दरम्यान: कर्तव्य शून्य समाज कल्याण अधिकारी समाधान इंगळे यांची त्वरित अक्कलपट्टी करा अशा मागणीसाठी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर फाउंडेशनच्या वतीने पीडित महिला सर्व अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांसोबत सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून अमरण उपोषणाची हत्यार उपसलेले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम