स्वाभिमान महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम विष्णुदास भावे मध्ये संपन्न ! विद्यार्थ्यांनी घेतला मोठ्या प्रमाणात सहभाग!
नवी मुंबई : सानपाडा येथील प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल यांच्यावतीने बुधवारी विष्णुदास भावे नाट्यगृहांमध्ये स्वाभिमान महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्वाभिमान महाराष्ट्राचा सांस्कृतिक जागर यशस्वीरित्या राबविला
सदर कार्यक्रमात छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर जोशी , प्रमुख पाहुणे जयंत खाडिलकर, नाट्य अभिनेता मयुरेश प्रेम, व या कार्यक्रमाला दुबई येथील उद्योजक नायर आणि त्यांची पत्नी सौ नायर देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या काळात लोप पावत चाललेली महाराष्ट्राचे संस्कृती त्याचा जागर करण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात आले सदर कार्यक्रमांमध्ये जागर गवळण शिव आरती देवीचे नृत्य कोळीगीत आदिवासी नृत्य दिंडी जोगवा अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.
दरम्यान: आपण कमवत असलेले संपत्ती त्याचा समाजासाठी काहीतरी उपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेतून उद्योजक नायर यांनी शिक्षण क्षेत्रात चांगल्या रीतीने काम करणाऱ्या प्राथमिक विद्यालय विवेकानंद स्कूल शाळेला या कार्यक्रमादरम्यान आर्थिक देणगीही दिली
कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे जयंत खाडिलकर यांनी समाजातील शिक्षकाचे स्थान आणि ते समाजाच्या प्रगतीसाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर जोशी यांनी संस्था करत असलेल्या विद्यार्थी उपयोगी उपक्रमांची माहिती दिली. मागेल त्याला शिक्षण या नियमाप्रमाणे शाळा एकूण २५००० विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा यज्ञ अहोरत चालवत आहे अशी माहिती दिली
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेश्मा देशपांडे यांनी अहवाल वाचन केले त्याचप्रमाणे शाळेत राबवण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचा आढावा घेतला. या कार्यक्रमा-साठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम