नवी मुंबई महानगर पालिका तर्फे क्रीडा स्पर्धाचे आयोजन! पालिकेच्या कर्मचारी अधिकारी वर्गाने घेतला सहभाग!

नवी मुंबई : शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या तणावा-पासून थोडीफार प्रमाणात का होईना मुक्तता मिळावी म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने भारतरत्न राजीव गांधी  क्रीडा संकुलनामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला क्रिकेट कॅरम महिला पुरुष;हॉलीबॉल; अँथलोटिक्स रनिंग, महिलांसाठी संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा इत्यादी क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे सदरची स्पर्धा दिनांक २६ते ३० तारखेचा दरम्यान सुरू राहणार आहे.

क्रिकेटच्या आतांरक्रिडा स्पर्धे मध्ये ३६ विभागातील टीम नी सहभाग घेतला बुधवारी झालेल्या अंतिम मॅच  मध्ये कोपरखैरणे विभाग कार्यलाय व अग्निशमन विभाग ह्यानी मजल मारली या सामन्यात कोपरखैरणे विभागाने अग्निशमन विभागाला 40 धावांचे लक्ष ठेवले होते , पण ह्या चुरशीच्या मॅच मध्ये  कोपरखैरणे विभागाचे खेळाडू ने 7 धावा राखून  सामना जिंकला 

दरम्यान विजेते टीमचे  क्रीडा  उप आयुक्त श्री सोमनाथ पोटरे यांनी अभिनंदन केले त्या वेळी कोपरखैरणे विभागाचे विभाग अधिकारी प्रशांत गावडे , क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व कर निरीक्षक विठ्ठल हिवरकर,  गणेश अघाव, सोबत सर्व विजयी टीम ने एकत्र जमून जल्लोष साजरा  केला

 महानगरपालिकेने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत पालिकेच्या 36 संघाने सहभाग घेतल्याने सर्वच संघाचे नवी मुंबई महानगर पालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागा-कडून कौतुक करण्यात येत .


संबंधित पोस्ट