नवी मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारोजगार मेळावा व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न
नवी मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगंध कुटी बुद्ध विहार, जुई नगर येथे महारोजगार मेळावा व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. गरजू आणि होतकरू बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री अविनाश महातेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस एल. आर, गायकवाड, युवक अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष टिळक जाधव, आयटी सेलचे प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे, उपाध्यक्ष एम. के भालेराव, सुभाष भोळे, सुरेश कोरे, सुरेश कांबळे, संतोष ढेपे, लक्ष्मण गोडसे, बेलापूर विधानसभा अध्यक्ष मंगेश गायकवाड, ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेश तळेकर, बेलापूर विभाग अध्यक्ष सुनील रसनभैरे, संकेत पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार महामेळाव्यामध्ये अनेक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम