वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकाराला विठ्ठलवाडी पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली ठेवले डांबून ! पत्रकार, आणि शिवसैनिकांनी, केली नाराजी व्यक्त !

नवी मुंबई - उल्हासनगर शहरात गेली ४० वर्ष पत्रकारितेत कार्यरत असणारे आनंद दिघे यांचे विश्वासू शिवसैनिक म्हणून महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाचे दोन वेळा नगरसेवक   राहिलेले  दिलीप मालवणकर यांनी सोशल मीडियातून केलेल्या परखड लिखाणाबाबत, माजी नगरसेवक रमेश चव्हाण याच्या तक्रारीवरून, विठ्ठलवाडी पोलिसांनी पत्रकार मालवणकर यांना  नोटीस बजावली होती. त्यानुसार मालवणकर हे पोलीस  ठाण्यात  हजर राहिले विठ्ठलवाडी पोलिसांनी मालवणकर यांना चौकशीच्या नावाखाली डाबुन ठेवल्याचा आरोप विठ्ठलवाडी पोलिसांच्या वरती होत आहे

याबाबत पत्रकार आणि शिवसैनिकांनी विठ्ठलवाडी पोलिसा विरोधात नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांच्या दडपण शाही विरुद्ध रोषपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत माहिती अशी की शिवसेनेतून फुटून शिंदे गट निर्माण झाल्यापासून, दिलीप मालवणकर हे सातत्याने शिवसैनिकांमध्ये धुमसत असलेल्या रागाचे परखड मत लिखाणातून  प्रतिबिंबित करीत,  होते. त्यातूनच माजी नगरसेवक रमेश  चव्हाण  याच्या संभाजी चौकातील आॅनप्लॉट असलेल्या आलिशान बंगल्याच्या टॅक्स असेसमेंट व पेनल्टीवर प्रश्न उपस्थित करत, पत्रकार दिलीप मालवणकर यांनी लिखाणातून टिकास्त्र सोडले. याबाबत चव्हाण याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी  १५३ (अ), (१)५००, ५५६ इत्यादी कलमे टाकून अटकेचा बडगा उगारला. विठ्ठलवाडी पोलिसांनी मालवणकर यांना अटक न करता गुन्हे शाखेचे

 पी आय धनंजय कापरे यांच्या कार्यालयात बसवून ठेवले असल्याचे माहिती मिळत आहे

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मालवणकर यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने व ह्यापूर्वीच मालवणकरांची ह्रदय शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना तत्काळ रामरक्षा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट