कोपरखैरणेत पोलिसाला मारहाण ! मटणाचा रस्सा वाढण्यावरून वाद,हॉटेल मालक व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

नवी मुंबई : हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या किरण साबळे व त्यांच्या मित्राला हॉटेल मालक व सहकार्यानी जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. 

कोपरखैरणे सेक्टर १४ येथील जगदंब ढाबा या हॉटेलात कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस किरण साबळे व व त्यांचा एक मित्र रात्री ११.३० च्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले असता मटणाचा रस्सा वाढण्यावरून वेटर बरोबर त्यांचा वाद झाला वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले परिस्थिती हाताबाहेर जात  असल्याचे पाहून किरण साबळे यांनी हॉटेल मालक व कर्मचारी यांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला परंतु एका कर्मचाऱ्याने शटर बंद करून टाकले व पुन्हा दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत साबळेंच्या ओठांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारा-साठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी हॉटेलचा मालक व कर्मचारी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.

संबंधित पोस्ट