रेल्वे स्थानकावरील पार्किंग समस्येवर तोडगा निघणार, सिडको तर्फे वाहतूक विभागाला लेखी निवेदन

नवी मुंबई : सिडको ने ऐरोली ते पनवेल आणि वाशी ते पनवेल रेल्वे  महामार्गावरील स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी वाहन तळे विकसित केले आहेत. तरीदेखील बरीचशी वाहने बेकायदेशीर ठिकाणी पार्क केली जातात. ज्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे, वाहतूक कोंडी बेकायदा पार्किंग समस्येबाबत सिडको व वाहतूक विभागा-मार्फत योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी सिडकोने वाहतूक विभागाला लेखी पत्र व्यवहार केला आहे. 

सिडकोच्या पार्किंग व युटिलिटी विभागाकडून ही पावले उचलण्यात आली आहेत. अनधिकृत पार्किंगची समस्या खांडेश्वर, मानसरोवर व विशेषतः कोपरखैरणे स्थानकाबाहेर मोठ्या स्वरूपात आहे. काही दिवसांपूर्वी मानसरोवर रेल्वे स्थानकावर बाहेर अनधिकृत ठिकाणी पार केलेल्या दुचाकींना आग लागल्याची घटना ताजी आहे या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे असे सिडकोने नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाला कळविले आहे. 

लवकरच नवी मुंबई वाहतूक विभाग व सिडको यांच्यामध्ये बैठक होणार असून रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग समस्येवर योग्य तो तोडगा निघण्याची शक्यता आहे .

संबंधित पोस्ट