
भोंगळ कारभारामुळे कोपरखैरणेतील भारतगॅस एजन्सी बंद.
ग्राहकांच्या वारंवार तक्रारीमुळे वरिष्ठांनी केली कारवाई
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर २ येथील 'विघ्नहर गॅस एजन्सी' चा भोंगळ कारभार भारत गॅस च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात येताच एजन्सी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे घरगुती गॅस ची किंमत १ हजाराच्या पलीकडे गेली असता एजन्सीचे कर्मचारी येथील ग्राहकांना सुविधा पुरवत नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात असल्याने कारवाई करण्यात आली.
दरम्यान या कारवाईमुळे घरगुती गॅस घेण्यासाठी स्थानिक ग्राहकांची एकच झुंबड उडाली. ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना रिक्षा किंवा मोटरसायकलद्वारे सिलेंडर आणून घरी घेऊन जावा लागत असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय गॅस बुकिंग करण्यासाठी कार्यालयात येऊनच बुकिंग करावी व घणसोली पाम बीच रोड येथून सिलेंडर उपलब्ध करून दिला जात आहे. व दोन-तीन दिवसात ग्राहकांच्या सोयीसाठी दुसरी एजन्सी नेमली जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम