
वीर वाजेकर महाविद्यालयात लोकनेते खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला स्वसरंक्षण कार्यशाळा संपन्न.
नवी मुंबई : वीर वाजेकर महाविद्यालयात Internal Complaint Committee च्या वतीने महिलांना मुलींना स्वतःचे स्वरक्षण कसे करता आले पाहिजे यासाठी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले.
उद्धघाटकीय मनोगतातून प्राचार्य पवार यांनी म्हटले की,हल्लीच्या युगात मुलीकडे आत्मविश्वास असला पाहिजे.मुलींनी स्वतः चे रक्षण स्वतः च केले पाहिजे.त्यासाठी महाविद्यालयात आवर्जून आशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी जास्तीत जास्त या कार्यशाळे मध्ये सहभाग घेऊन आपले स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षमता प्राप्त करावी असे मत व्यक्त केले
दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन ICC च्या चेअरमन डॉ.स्मिता तांदळे यांनी केले होते उपप्राचार्य, डॉ.विलास महाले यांनी प्रास्ताविक केले.या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक गोपाळ म्हात्रे सहकारी आमिषा घरत,अमिता घरत,अनिष पाटील हे होते.गोपाळ म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलींना स्वसंरक्षण कसे करावयाचे याविषयी प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेचे आभार प्रा.सौ आर एफ इनामदार यांनी केले.या कार्यक्रमास डॉ.श्रेया पाटील,डॉ.मयुरी मोहिते,डॉ. मऱ्याप्पा चुडाप्पा सोनवले, डॉ.चेतना तुमडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जमकु चदाना हिने केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम