
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते डॉ. मर्याप्पा सोनवले यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांना पनवेल संघर्ष समितीचा व कांतिलाल कडू सामाजिक प्रतिष्ठानचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विधानपरिषदेच्या सभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांना शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्याच दरम्यान डॉक्टर प्राध्यापक सोनवले यांच्या कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आलेला आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहेत त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून तब्बल ११४ रक्तदान करून रुग्ण व्यक्तींना जीवदान देण्याचे काम देखील केलेले आहे.
दरम्यान : यापूर्वी त्यांना कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्याकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ. सोनवले यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित आहेत. डॉ. सोनवले यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ४० शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्यांनी ११४ वेळा रक्तदान केल्याने त्यांना आतापर्यंत ५ पेटेंटस मिळाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी.जी. पवार व महाविदयालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी व प्राध्यापकवृंदानी त्यांचे अभिनंदन केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम