नवी मुंबई काँग्रेस पक्षाचे नसीर हुसेन यांची महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड

नवी मुंबई : नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते  नासिर हुसेन यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटी पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आलेली आहे

 ही निवड महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या मान्यताने झालेली आहे

दरम्यान: नासिर हुसेन हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय भाग घेतला असून नवी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बांधणीसाठी त्यांचा मोठा सहभाग आहे.

दरम्यान : यापूर्वी नासीर हुसेन यांनी नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्य प्रवक्ता पदाची जबाबदारी अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे.

काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठे बरोबर ते सतत कार्यरत असल्याकारणाने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे नवी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले आहे

संबंधित पोस्ट