शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वीर वाजेकर महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न.

नवी मुंबई: वीर वाजेकर महाविद्यालयात लोकनेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या येत्या १२ डिसेंबरच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ५ डिसेंबर २०२२ रोजी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी प्राचार्य पवार विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की विद्यार्थीनी विज्ञानात नवनवीन संशोधन करून देशातील शेतकरी,गरीबी यासाठी उपयुक्त संशोधन करावे  त्यातूनच आपल्या शिक्षणाची योग्यता देशहितासाठी कामा येईल असे मत उद्घाटन प्रसंगी प्राचार्य पवार यांनी व्यक्त केले सदाचे प्रदर्शन डॉ.गुरमित वाधवा यांनी  घडवून आणले. 

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले  तर डॉ.स्मिता तांदळे यांनी कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

कार्यक्रमास डॉ.राहुल पाटील,प्रा.यशवंत गायकवाड  प्रा. चेतना तुमडे, प्रा. इनामदार मॅडमआदी प्राध्यापक व रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणि शास्त्र विभागाच्या डॉक्टर श्रेया पाटील यांनी केले

संबंधित पोस्ट