नवी मुंबईतील विविध गुन्ह्या संदर्भात पोलीस उपयुक्त विवेक पानसरे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

नवी मुंबई :नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील एकूण चार गुन्हे संदर्भात माहिती उघडकीस आणली असून ४ गुन्ह्यातील आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्या मुस्क्या आवळण्यात  यश प्राप्त केले आहे

कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी रमेश साहेबराव शिंदे वय वर्ष (४८) राहणार बालाजी सिनेमा समोर झोपडपट्टी कोपरखैरणे नवी मुंबई याच्या संशयस्पदी हालचालीवरून पोलिसांना संशय आल्याने त्याच्या ताब्यातील गोठड्या मध्ये २ किलो ८६३ ग्राम वजनाचा ३२ हजार रुपये किमतीचा गांजा कोपरखैरणे ठाण्याच्या पोलिसांनी जप्त केला असून आरोपीला बेड्या ठोकले आहेत ही कारवाई कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या सूचने नुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी यशस्वी केली आहे   एमआयडीसी दिघा साठे नगर येथील आरोपी लक्ष्मण सिद्राम अनंते वय वर्षे (३०) हा दिघा परिसरात अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांना मिळाली असता त्यांनी यशस्वी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपीकडून दोन किलो दहा ग्रॅम वजनाचा २० हजार किमतीचा गांजा जप्त केलेला आहे.

 तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीतील तुर्भे नाका परिसरात सासू सोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा राग मनात ठेवून एक बंगाली इसमाची  हत्या केल्याची घटना घडली होती त्या घटनेतील आरोपी मोनु राजकुमार दीक्षित वय वर्ष (३३) धंदा मजुरी राहणार तुर्भे नाका व आरोपी हेमेंद्र वय वर्ष 38 राहणार इंदिरानगर  तुर्भे या आरोपीस देखील तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. वाशी पोलीस स्टेशन हद्दीत  एक इसम  पिस्तूलसह हद्दीत येणार असल्याची पोलीस कर्मचारी अविनाश उत्तम मोकळे यांच्यामार्फत  गुप्त माहिती मिळाली होती आरोपी बाबतची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीस गजाआड केली आहे आरोपीकडून पिस्तूल व १० जिवंत  राउंड हस्तगत करण्यात आले आहेत 

 वाशी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  पोलीस उपनिरीक्षक  दत्तात्रय वने यांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांना माहिती देताच वने व त्याच्या पथकातील पोलिसांनी मॅग्नेट बार जवळ यशस्वी सापळा रचून आरोपी सोनू सिंग याला रिवाल्वर सह ताब्यात घेतले आहे 

 तपासादरम्यान सदर आरोपी आर्मी शिपाई पदावर असल्याचे उघडकीस आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वने करत आहेत 

दरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील झोन एक मधील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी आरोपींना मुद्देमाला सह अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे.

संबंधित पोस्ट