
कविता भंडारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (गटाच्या) कोपरखैरणे अध्यक्षा पदी निवड !
नवी मुंबई: गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या कविता श्याम भंडारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोपरखैरणे विभागीय अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आलेली आहे ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत सरकारचे राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा शीलाताई रमेश बोदडे व पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नवी मुंबई प्रभारी सिद्राम ओव्हाळ यांनी कविता भंडारे यांना नियुक्तीपत्र देऊन कोपरखैरणे विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी कविता भंडारे यांच्यावर सोपवलेली आहे
दरम्यान: कविता भंडारे ह्या समाजातील महिलांना सोबत घेऊन काम करणाऱ्या व्यक्तिमत्व असून पक्ष वाढीसाठी त्यांचा भविष्यात मोठा हातभार लागेल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम