राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विचाराचा अनमोल ठेवा शहाजी छत्रपती संग्रहालयात जतन करा! सचिन कटारे यांची मागणी

नवी मुंबई : कोल्हापुरातील शहाजी छत्रपती संग्रहालय,  या ठिकाणी   लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक घटनांची माहिती चित्र स्वरूपात तसेच इतर गोष्टींच्या स्वरूपात संकलन केलेली आहे  हा अनमोल ठेवा पाहून समाजातील सर्वच घटकाला खूप आनंदही होतो पण हा अनमोल ठेवा पाहत असताना राजश्री शाहू महाराज आणि या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहमय ऋणानुबंधा प्रति व्यक्त होणारी एकही गोष्ट किंवा एकही प्रतिमा  त्या ठिकाणी आढळून येत असल्याची खंत सचिन कटारे यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या प्रति केलेले सहकार्य, बाबासाहेबांना  शिक्षणासाठी  मदत, त्यांच्या मूकनायक या पक्षिकासाठी केलेली मदत, बाबासाहेबांना संपूर्ण मागासवर्गीयांचा नेता म्हणून संबोधित करणारी माणगाव येथील परिषदेमधील शाहू महाराजांची घोषणा, आणि बाबासाहेबांनी शोषित वर्गांच्या उत्थानासाठी उभारलेल्या चळवळीसाठी शाहू महाराजांनी केलेले एकूण सहकार्य आणि योगदान, बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी कारणीभूत ठरले. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि नोंदी असतानाही आपल्या भारत देशाच्या आजच्या जडणघडणीमध्ये ज्या दोन महापुरुषांचा प्रचंड मोठा वाटा आहे  त्यांचे नातेसंबंध जपणारा एकही ठेवा या संग्रहालयामध्ये नसल्याची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे 

दरम्यान: राजश्री शाहू महाराजांचा संपूर्ण जीवनपट या संग्रहालया च्या माध्यमातून उलगडत असताना त्यांच्या जीवनातील बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण कप्पा या  संग्रहालयामध्ये संपूर्ण रिकामा असल्याची जाणीव पदोपदी होत राहते.

 त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या सोशल मीडिया आणि आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन दत्तू कटारे यांनी कोल्हापूरचे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिली असून  या सर्व गोष्टींची लवकरात लवकर दखल घेऊन छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलाही अनमोल ठेवा या शहाजी छत्रपती संग्रहालयात जतन करण्यात यावा किंवा  संग्रहालयात तो संग्रही असावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे केलेली आहे

संबंधित पोस्ट