घणसोली येथील बुद्ध घोष बुद्ध विहारात सुभेदार रामजी बाबा सकपाळ यांची जयंती साजरी!

नवी मुंबई : परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी बाबा सकपाळ यांची जयंती घणसोलीतील बुद्धघोष बुद्ध विहारात साजरी करण्यात आली.

दरम्यान सुभेदार रामजी बाबा सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांनी रामजी बाबा यांच्या कार्याची माहिती देऊन परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यासाठी रामजी बाबांचे किती मोठे योगदान आहे याबाबत माहिती दिली. त्याच दरम्यान

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (कांबळे )या पक्षाचे राष्ट्रीय सचिव एच. बी. जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन करून रामजी बाबा यांच्या कार्याची योग्य ती माहिती देऊन उपस्थित बांधवांना सुभेदार रामजी बाबा सपकाळ यांच्या महान कार्याची महंती पटवून दिली.

यावेळी घणसोली विभागातील क्लासिकल गायक महेंद्र कांबळे, उत्तम रोकडे,  राहुल बोराडे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक  आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष  रमेश बनसोडे,  समाधान पोटभरे, अविनाश कोरडे, राजेश निकम,पत्रकार गायकवाड मोहन सटवा बनसोडे,  डी.जे.सूर्यवंशी,  अनिता ह.अहिरे, विद्या मोहन बनसोडे, सुशिला दुपारे, अर्चना जगताप, डांगे इत्यादी कार्यकर्ते व कार्यकर्त्यां यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट