रिपब्लिकन नेते दिवंगत बी सी कांबळे यांचा स्मृतिदिन पनवेल मध्ये साजरा !

नवी मुंबई भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तालमीत तयार झालेले तत्त्वनिष्ठ तत्त्वज्ञानी सच्चा शिष्य रिपब्लिकन पक्षाचे नेते घटना तज्ञ  माजी खासदार दिवंगत बी सी कांबळे उर्फ बापूसाहेब कांबळे  यांचा १६ वा स्मृतिदिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे गट) यांच्यावतीने पनवेल  खांदेश्वर येथील आगरी शैक्षणिक संस्था या ठिकाणी पक्षाच्यावतीने जाहीर अभिवादन सभा घेऊन साजरा करण्यात आला. 

यावेळी बी सी कांबळे यांच्या कार्या बद्दल विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे गट) पक्षाला मोठे करण्यासाठी व बापूसाहेब यांचे उर्वरित कार्य पुढे नेण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी तन मन धनाने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत विविध मान्यवरांनी अभिवादन सभेदरम्यान बोलताना व्यक्त केले यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी साहित्यिक एच बी जाधव, केंद्रीय उपाध्यक्ष श्याम डीगळे,  मुंबई कमिटीचे पि.डी. जाधव, गोवा राज्याचे प्रमुख अमित कोरेगावकर, सेक्रेटरी गोवा राज्य तुलसीदास पवार, पुणे सेक्रेटरी भीमराव सोनवणे, पुणे अध्यक्ष आनंद कांबळे, अविनाश कांबळे नाना कांबळे एम एम वाघमारे, आंबेडकर चळवळीतील गायक महेंद्र कांबळे, एस बी रणपिसे दिंडोशी गोरेगाव,पत्रकार सुनील गायकवाड, नंदू मोहिते महेंद्र कांबळे (गोवंडी) संत श्री हारल्या सेवक संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे अध्यक्ष व जनरल सेक्रेटरी सूर्यकांत कांबळे, व विमल कांबळे उपस्थित होत्या

संबंधित पोस्ट