राष्ट्रीय समाज पक्षाच्या माजी ठाणे जिल्हाध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश !

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यामध्ये माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या माजी ठाणे जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे प्राध्यापक कवाडे यांनी विकास गायकवाड यांना ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. 

विकास गायकवाड यांनी यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पद भूषविले असून राष्ट्रीय समाज पक्षाला ठाणे जिल्ह्यामध्ये नावारूपाला आणून पक्षाची ओळख निर्माण केली होती 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकार मंत्री असताना ठाणे जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कडे  जानकर यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विकास गायकवाड यांनी केला होता त्याच दरम्यान गायकवाड यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा ठाणे जिल्ह्य अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिलेला होता

दरम्यान: विकास गायकवाड यांची कार्यकर्त्यावर चांगली पकड असून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केल्याने ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद निश्चितपणे वाढेल असा विश्वास ठाणे जिल्हा लोकसभा प्रभारी महेंद्र पवार यांनी व्यक्त केलेला आहे. पक्षप्रवेशा दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे ठाणे शहर जिल्ह्याचे माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

संबंधित पोस्ट