घणसोली मध्ये दिवाळीनिमित्त मोफत अन्नधान्य व जीवनाशक वस्तूंचे वाटप.

नवी मुंबई :सर्व सामान्य नागरिकांना दिवाळी गोड जावी या हेतूने घणासोली मध्ये नगरसेवक घनश्याम मढवी ,समाजसेवीका सौ.ललिता मढवी यांचा स्तुत्य उपक्रमाने 

महागाईच्या काळात नागरिकांची दिवाळी गोड व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मोफत अन्नधान्य व जीवनाशक  वाटप करण्यात आल्या 

दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून. नगरसेवक घनश्याम मढवी  व सावित्री महिला सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने घणसोली गावातील जनसंपर्क कार्यालयासमोर सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्प दरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच परिसरातील आदिवासी व नाका कामगार यांच्यासाठी मोफत अन्नधान्य किटचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी घेतला या उपक्रमाबद्दल सावित्री महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष ललिता मढवी यांचे समस्त नागरिकांनी विशेष कौतुक केले. मागील तीन दिवसापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला असुन . घणसोली विभागातील हजारो नागरीकांनी याचा लाभ घेतला. प्रत्येक दिवसाच्या या उपक्रमात शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यात प्रामुख्याने दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ लक्ष्मण म्हात्रे यांच्या हस्ते दिनांक 18 रोजी समाजसेवक,प्रभाग समीती सदस्य श्री. परशुराम ठाकूर व दिनांक 19 ऑक्टोबर 

रोजी युवा उद्योजक संदीप शेठ घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेवक उत्तम मात्रे, परिवहन समितीचे माजी सभापती दिलीप म्हात्रे, वैभव पतपेढीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, माजी परिवहन सदस्य केशव पाटील, घणसोली देवस्थान संस्था सचिव मंगेश म्हात्रे, समाजसेविका निर्मला रानकर, समाजसेविका रेखा म्हात्रे, समाजसेवक गणेश खपके व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट