पाटण तालुक्याचे अध्यात्मिक गुरु भगवान बाबा गुरव यांचे निधन

नवी मंबई : पाटण तालुक्याचे अध्यात्मिक  गुरु सळवे गावाचे रहिवासी भगवान बाबा गुरव यांचे वयाच्या ९० वर्षी वृद्धपाकालाने गुरुवारी निधन झाले पाटण तालुक्यामध्ये धार्मिक क्षेत्रात भगवान बाबा गुरव गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते विविध गावाच्या मंदिरामध्ये भगवान बाबा देखभालीचेचे काम करत असत त्यातूनच ते नागरिकांना धार्मिक आणि अध्यात्मिक शिक्षण देत असत त्यांना गावामध्ये अण्णा या नावाने  संबोधले जात होते 

दरम्यान: त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार असून मुलगा जयवंत महाराज गुरव हे देखील वडिलाप्रमाणे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. दुसरा मुलगा अनिल हा गावच्या मंदिराचा सेवेकरी म्हणून मंदिराचे काम पाहत आहे तर मुलगी छाया ही विवाहित आहे.

भगवान बाबा गुरव यांच्या निधनाने पाटण तालुक्यात व साळवे गावात शोककळा पसरलेली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भगवान बाबा यांना श्रद्धांजली अर्पण केली

संबंधित पोस्ट