विजेच्या कडकडाटासह नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस वाऱ्याने ऐरोली मध्ये कोसळले झाड !

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली वादळ वाऱ्याचा विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.

 यातच ऐरोली नाका ब्रिजच्या आसपास असलेले बदामाचे झाड वादळाने जागीच कोसळले. पावसा दरम्यान या झाडाखाली काही नागरिक आडोशाला उभे  होते दमदार पावसाच्या हजेरीने बदामाचे झाड कोसळल्याने आडोशाला उभे असलेल्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रेमानाथ कांबळे, संतोष राजे, देखील या झाडाखाली उभे होते या दुर्दैवी घटनेमध्ये सुदैवाने मात्र कोणत्याच नागरिकाला दुखापत इजा झाली नाही.

संबंधित पोस्ट