महर्षी वाल्मिकी जयंती ठाण्यात साजरी!

नवी मुंबई :महागुरु भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंत ठाण्यातील साठेवाडी ज्ञानसाधना काॅलेज या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात भगवान वाल्मिकीजी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी चे ठाणे शहर महासचिव मोहन नाईक  यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले

यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळाचे अध्यक्ष अनिल वैद्य, तसेच राजेशजी सिंग व नरेशजी बोहित यांनी वंचित आघाडी च्या कार्यकर्त्यांच पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले.

दरम्यान: ठाण्यातील मनोरुग्ण हाॅस्पीटल परिसरातील विश्वभारती मित्र मंडळाच्या वतीने हि भगवान महर्षी वाल्मिकी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी वाल्मिकी समाजाचे नेते नंदु सौदे यांनी महर्षी वाल्मिकी जयंती दरम्यान  उपस्थित असलेल्या नागरिकासमोर  भगवान महर्षी वाल्मिक यांच्या बद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे कोपरी विभागप्रमुख प्रविणभाऊ गायकवाड  , आय.टी सेल चे रविंद्र कांबळे , वरिष्ठ कार्यकर्ते संजय बुकाणे , ठाणे शहर उपाध्यक्ष संतोषराव वानखेडे, ठाणे शहर संघटक आप्पासाहेब साळवे, स्थानिक कार्यकर्ते लक्ष्मण पटेकर , धर्मवीर नगर चे शाखाध्यक्ष शैलेश वानखेडे , निलेश ठोंबरे आणि आनंद नगर चे महासचिव विकास इंगळे आणि पत्रकार आनंदा वाघमारे उपस्थिती होते.

दोन्ही ठिकाणी वाल्मीकी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सल्लागार श्री राजेश चिंडालीया , श्री.राजेंद्र करोतीया , सौ.सोनी वाल्मिकी, बिरजू चौहान व मुकेश सौदे यांनी मेहनत घेतली

संबंधित पोस्ट