
अनधिकृत लाकडी वखार परिसरात सिडकोच्याअतिक्रमण विभागाची कारवाई.
नवी मुंबई : घणसोली येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील लाकडी वखार भागातील सिडकोच्या प्लॉटवर अतिक्रमण केलेल्या लाकडी वखारीच्या अनधिकृत गोदामांवर सिडकोच्या वतीने कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून लेखी स्वरूपात नोटीस बजावूनही नियमांची पायमल्ली होत असल्याने ही कारवाई अपेक्षित होती याशिवाय संबंधित प्लॉट सिडको तर्फे विक्री झाला असूनही अतिक्रमण होत असल्याने कारवाई केल्याचे अधिकाऱ्याकडून वर्तविण्यात आले.
यावेळी सिडकोच्या अतिक्रमण अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक यांच्यासह एक जेसीबी, तीन डंपर असा ३० लोकांच्या पथकाचा फौजफाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान ही कारवाई केल्याने येथील अनधिकृत व्यावसायिकांचे सिडकोच्या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम