
डंपरचा ब्रेक फेल झाल्याने वाशी टोल नाक्यावर अपघात! मोटर सायकल स्वार गंभीर जखमी
नवी मुंबई : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी वाहनांना एका डंपरचा ब्रेक फेल झाल्याने जोरदार धडक देत अपघात झाल्याची घटना वाशी टोलनाका परिसरात घडली आहे.
त्यात मोटरसायकल स्वर गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पायाला गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र
सुदैवाने अपघातात कोणत्या प्रकारचे जीवित हानी झाली नसून चार चाकी वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाशी टोल नाक्यावर मर्सिडीज व इतर वाहने रस्ते नियमाचे पालन करून एका लेन मधून मागोमाग चालत होते अचानक ब्रेक फेल झालेल्या सुसाट वेगाने असलेल्या ८ चाकी डंपरने रोडवरील चार चाकी वाहनांना धडक देत मोठ्या प्रमाणात त्या वाहनांचे नुकसान केलेले आहे.
अपघात केलेल्या डंपर ने धडक दिलेल्या मर्सिडीज गाडीमध्ये दोन लोक गाडीतच अडकलेले होते. त्यांची सुखरूप सुटका अग्निशमन दल वाशी कार्यालयाचे सहाय्यक केंद्र अधिकारी संदेश चन्ने यांच्या मार्गदर्शना-खाली अग्निशमन जवानाने केली असून अडकलेल्या दोन व्यक्तींना बाहेर काढण्यात यश प्राप्त केलेले आहे.
दरम्यान: पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून क्लीनरला देखील ताब्यात घेतले आहे. मात्र वाहन चालक डंपर सोडूनच पळून गेल्याची माहिती असून याबाबतचा अधिक तपास वाशी पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी करत आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम