महिला वर्गाला भयभीत करणाऱ्या अट्टल चोरट्याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी केली अटक!

नवी मुंबई (प्रतिनिधी) परिसरामध्ये नग्न अवस्थेमध्ये फिरून महिलांची आणि नागरिकांची झोप उडवणाऱ्या सराईत चोरट्याला रबाळे पोलिसांनी शिताफिने अटक केलेले आहे.

चोरी करण्यासाठी चोरटे कशाप्रकारे शक्कल लढतील हे सांगता येणार नाही अशाच एक अभिनव शक्कल लढविणाऱ्या चोरट्याच्या मुस्क्या आवळण्यात रबाळे एमआयडीसी पोलिसांना यश प्राप्त झालेले आहे या चोरट्याचे नाव आदित्य प्रेमचंद्र गुप्ता उर्फ (काल्या) असे असून तो कळवा मनीषा नगर येथ राहणार आहे 

हा चोरटा नग्न अवस्थेमध्ये परिसरात फिरून घरपोडी करत असल्याचे समोर आलेले आहे त्याच्यावर एपीएमसी व टायघर  पोलीस ठाण्यात देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे. 


याबाबत माहिती अशी की रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये एक घरफोडीची तक्रार दिनांक 12/ 9/ 2022 रोजी दाखल झाली होती अज्ञात आरोपीबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती नसताना रबाळे पोलिसांचा तपास  सुरू केला. विभागातील गल्ली गल्लीतील कॅमेरे चेक करून सुद्धा आरोपीचा सुगावा लागत नव्हता मात्र गुप्त माहितीच्या बातमीदार द्वारे  रबाळे पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी आदित्य प्रेमनाथ गुप्ता उर्फ (कालिया) याच्या मुस्क्या आवळण्यात यशस्वी ठरले आहेत

दरम्यान:आरोपीला पोलीस खक्क्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे.

हा तपास नवीमुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्या आदेशानुसार रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुरज जाधव व त्याच्या पथकाने उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून लहान मुले पळविले जातात अशा प्रकारची अफवा नवी मुंबई शहरामध्ये मध्ये पसरली होती अशाच प्रकारची अफवा रबाळे एमआयडीसी परिसरात या चोरट्याच्या नग्न अवस्थेमध्ये फिरण्याने पसरलेली होती मात्र या चोरट्याला पोलिसांनी अटक केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे

संबंधित पोस्ट