मी आलो आहे बुद्ध विहारला भेट देण्यासाठी!... मी जाणार आहे सिडकोची मान्यता घेण्यासाठी-रामदासजी आठवले

नवी मुंबई (प्रतिनिधी)घनसोली विभागातील बौद्ध बांधवांचे बुद्ध विहारे तात्कालीन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्य काळामध्ये जमीन दोस्त करण्यात आली होती त्यानंतर बौद्ध बांधवांच्या प्रार्थना स्थळासाठी नवी मुंबईतील घनसोली विभागात एकही बुद्ध विहार नसल्याने सरकारचे राज्य मंत्री नामदार रामदास आठवले यांनी घनसोलीच्या बुद्धघोष बुद्ध विहाराला धावती भेट दिली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने नामदार आठवले यांना बुद्ध विहाराला जागा उपलब्ध होण्यासाठी निवेदन देण्यात आले 2009 पासून बुद्धघोष बुद्ध विहार हे सिडकोच्या जागेवरती उभे असून सिडको त्या बुद्ध विहारावरती कधीही कारवाई करू शकते म्हणून नामदार आठवले यांनी बुद्ध विहाराला भेट देऊन सिडको कडील जागेसंदर्भातली मान्यता मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बुद्ध घोष बुद्ध विहार ज्या जागेवरती उभे आहे ती जागा सिडको प्रशासनाने द्यावी अशी आग्रही भूमिका नामदार आठवले यांनी मांडली आहे

दरम्यान डॉक्टर बाबासाहेब सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष रमेश बनसोडे सेक्रेटरी एच बी जाधव बुद्ध विहार बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे सचिन कटारे चर्मकार समाजाचे नेते गोकुळ पहारे मुंबईचे माजी सहाय्यक फौजदार  डी जे सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे नेते गजानन जाधव जयराम जाधव अनिल पातरे आर डी रोकडे संभाजी रोकडे उत्तम रोकडे राहुल बोराडे रंजन प्रताप प्राची जाधव प्रकाश जाधव पांडुरंग सोनवणे बामसेफ  संघटनेचे संजय माळी इत्यादी धम्म बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

संबंधित पोस्ट