
घणसोली महानगर प्रभाग अंतर्गत गोठीवलीत अनधिकृत बांधकामांचे पुनश्च हरी ओम.
नवी मुंबई (प्रतिनिधी)अनधिकृत बांधकामा विरोधात मुंबई महानगरपालिकेची कारवाई सुरू असून मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने घनसोली विभागाच्या हद्दीत असलेल्या ठिकाणी दि.२९ ऑगस्ट रोजी गोठीवली गावातील मरीआई मंदिराजवळ मनपाकडे आलेल्या तक्रारीनुसार दोन मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. त्यानुसार अतिक्रमण विभाग अधिकारी शंकर खाडे व अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान. अनधिकृत बिल्डिंगच्या बिल्डिंगच्या तोडक कारवाई केलेल्या इमारतीचे मजले चढत असल्याचे प्राथमिक दर्शी पाहण्यास मिळत आहे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे यांचा अनधिकृत बांधकामावरती मोठ्या प्रमाणात वचक असून केलेल्या कारवाईत पुन्हा बांधकाम सुरू होत असेल तर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांनी ३ सप्टेंबर रोजी पुनर्बांधणीला पुनश्च सुरुवात केली आहे.
रोहित ठाकरे यांनी केलेल्या केलेल्या कारवाई वरती पुन्हा अनाधिकपणे बांधकाम सुरू होत असेल तर अतिक्रम विभागाचे अधिकारी रोहित ठाकरे कोणती भूमिका घेणार आहेत? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम