एपी एम सी पोलीस ठाणे अंतर्गत सतरा प्लाझा मध्ये जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू

जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करा !.. नागरिकांची मागणी !.

नवी मुंबई (प्रतिनिधी) एपीएमसी पोलीस ठाणे अंतर्गत सतरा प्लाझा या ठिकाणी जुगाराचा अड्डा मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू आहे यावर एपीएमसी पोलिसांचा आणि कायद्याचा कोणत्याच प्रकारचा धाक  नसल्याचे चित्र समोर येत आहे अशा राजरोसपणे चालणाऱ्या चुप्या आणि लाखो ची कमाई  करणाऱ्या गोरख धंद्यावर  पोलिसांनी करडी नजर ठेवून त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून होताना दिसत आहे. 

याबाबत माहिती अशी की  सतरा प्लाझा या इमारतीच्या  रूम  नंबर   173   पहिल्या मजल्यावर अमित  पंजवानी या जुगार मालकाचा शानदार जुगाराचा अड्डा बेधडक बिनधास्तपणे सुरू आहे या अड्डा्यात पत्याचा डाव लाखो रुपये लावून पत्ते शोकीन  खेळत असून या बेकायदेशीर धंद्यावर गुंडप्रवृती  अनेक प्रकारचे जुगारी आपले लक,नशीब अजमावण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील व इतरत्र विभागातून जुगार खेळण्यासाठी रोज येत असतात या जुगारी मंडळींना रसद पुरवण्याचे काम जुगार मालक करत आहे कधीकाळी या जुगार खेळता वेळी  या जुगार अड्ड्यावर कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान सतरा प्लाझा हे ठिकाणी नामांकित कंपनीचे शोरूम आहेत. तसेच व्यापारासाठी ऑफिस कार्यालय इतर  चांगल्या उद्योग- व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारे नवी मुंबई वाशीतील सुप्रसिद्ध असे ठिकाण आहे. 

मात्र या सुप्रसिद्ध ठिकाणा वरूनच जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरु आहेत ही गंभीर स्वरूपाचे बाब असून या बाबीकडे एपीएमसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नलावडे कधी आणि कशा प्रकारे कारवाई करतील याकडे सतरा प्लाझा मधील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यवसायिक  मंडळीचे लक्ष लागले आहे. हा जुगाराचा अड्डा जुगार मालकाने अशा स्वरूपाचा बनवला आहे की नेमके जाण्याचा प्रवेशद्वार देखील एखाद्या व्यक्तीला सापडणे  कठीण आहे अलीबाबाच्या गुहे पेक्षाही तट बंधक अशा स्वरूपाचे सतरा  प्लाझा मधील जुगाराचा अड्डा  आहे .या जुगाराच्या अड्डा च्या बाहेर जुगार मालकाचे काही खाजगी बाउन्सर उभे असून त्यांच्या विविध इशाऱ्यावर जुगार मालकाचे  काम होताना दिसत आहे . नागरिकांच्या सांगण्यावरून आमच्या  प्रतिनिधींनी प्राथमिक  स्वरूपाची माहिती  स्वतः अनुभवलेली आहे म्हणून या  जुगार अड्ड्यावर एपीएमसी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी होताना दिसत आहे .

संबंधित पोस्ट