
भीम योद्धा पंढरीनाथ गायकवाड ठाणे महानगरपालिकेच्या समाज भूषण पुरस्काराचे मानकरी !..
नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेले कळवा-विटावा येथील स्थानिक रहिवाशी पंढरीनाथ गायकवाड यांना ठाणे महानगरपालिका आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने ठाणे महानगरपालिके तर्फे देण्यात येणारा समाज भूषण पुरस्कार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे औचित्य साधून देण्यात आलेला आहे
दरम्यान : पंढरीनाथ गायकवाड हे ठाणे शहरातील नामवंत फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे नेतृत्व असून आज पर्यंत बहुजन समाजामध्ये एकोपा घडावा यासाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
ठाणे महानगरपालिकेचा अतिशय प्रतिष्ठित ठरणारा पुरस्कार चळवळीच्या योग्य कार्यकर्त्याला दिला गेल्याने बहुजन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
ठाणे महानगर पालिकेचा समाज भूषण पुरस्कार गायकवाड यांना मिळताच विविध थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम