गणेशोत्सवा निमित्त अन्न व प्रशासन विभाग ठाणे आणि नवी मुंबईतील मिठाई उत्पादक -विक्रेते यांच्या सोबत बैठक

नवी मुंबई: येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन ठाणे कार्यालयाने आज दि.२९/0८/२०२२ रोजी ठाणे  परिमंडळ ३ आणि ४ मधील  मिठाई उत्पादक  व विक्रेते यांची बैठक शांतीवन सोसायटी,परिसर, सेक्टर न.६ बेलापूर  नवी मुंबई येथे सहआयुक्त कोकण विभाग श्री सुरेश देशमुख यांच्या मर्गदर्शना खाली  बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत उपस्थितांना सहा.आयुक्त (अन्न) श्री. गौरव  जगताप   यांनी मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ इत्यादी अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करताना घ्यावयाची काळजी तसेच हायजिनीक कडिशन्स या बाबत माहिती दिली तसेच Fostac Training,तसेच भारतीय मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बीफोर डेट नमुद करणे बंधनकारक असुन त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर बैठकीस परिमंडळ २ चे सहायक आयुक्त श्री. अशोक पारधी  तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रश्नांत पवार व श्री. संतोष सिरोसिया उपस्थित होते सदर बैठकीस परिसरातील सर्व  मिठाई उत्पादक/ विक्रेते/ अन्न व्यावसायिक यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पवार यांनी केले.

संबंधित पोस्ट