नवी मुंबईमध्ये बिलकिश बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकेच्या निषेधार्थ निदर्शने

नवी मुंबई :  बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या समाजकंटकांना मुक्त करून जेलच्या बाहेर मिठाई भरून त्यांचा सत्कार करण्यात येतो, गुन्हेगारांना मोकाट सोडण्यात येते गुजरात मधील बिलकिस बानू प्रकरणातील अकरा गुन्हेगारांना गुजरात सरकारने मुक्त केल्या प्रकरणी  वाशी येथील शिवाजी चौकात नवी मुंबईतील विविध संघटनांच्या वतीने हातात निषेध पलक घेऊन गुजरात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. 

समाजसेवक डॉअजित मगदूम समाजसेविका नीला लिमये यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख खाजा मिया पटेल, घर हक्क संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष हिरामण पगार, यांच्यासह महाराष्ट्र महिला परिषद, अन्वय प्रतिष्ठान, परिसर सखी विकास संस्था, वि नीड यू सोसायटी, स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, म्युझिक अँड ड्रामा सर्कल, नवी मुंबई स्वयंसेवी संस्था, दिव्य नूर फाउंडेशन, टाऊन लायब्ररी, अन्नपूर्णा परिवार, महाराष्ट्र विकास मंच, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, कामगार एकता युनियन यांच्या स्थानिक ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करण्यात आले.

"नारी का कैसा सन्मान....? बलात्कारी घुमे सीनातान..."" बात नारी सन्मान की, 

कृती गुन्हेगारो को छोडने की.... " यावेळी अशा प्रकारचे काळे फलक महिलांनी हातात घेऊन रोश व्यक्त केला.

संबंधित पोस्ट