दोन मोबाईल चोरट्यांना कोपरखैरणे मध्ये अटक ! गुन्हे शाखेची कारवाई !..

नवी मुंबई:(प्रतिनिधी)नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीमध्ये मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार वाढल्यामुळे या प्रकरणाचा बीमोड करण्यासाठी  पोलीस आयुक्त नवीमुंबई मुंबई व सह पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त गुन्हे  यांनी आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त, गुन्हे व  सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा,यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून वपोनि विजयसिंह भोसले मध्यवर्ती कक्ष यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षा मार्फत समांतर तपास सुरु होता.

मध्यवर्ती कक्षाकडील सपोनि देवडे यांना दोन इसम चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असलेबाबत गोपनीय माहिती माहिती सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे मला मिळाली होती त्याआधारे  मध्यवर्ती कक्षाकडील अंमलदार यांनी कोपरखैरणे डी मार्ट परिसरात सापळा रचून खाली आरोपी आकाश राजेश कांबळे वय वर्ष (22 )राहणार कोपरखैरणे सेक्टर -14 व सिद्धेश सुरेश मौर्या  वय वर्ष 26 राहणार कोपरखैरणे सेक्टर -14 या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एपीएमसी वाशी, नेरुळ येथे दाखल असलेले खालील नमूद मोबाईल स्नॅचिंग गुन्हयातील मोबाईल आणि स्नॅचिंग करीता वापरलेली ऍक्टिवा होंडा टू व्हीलर गाडी मिळून आली 

दरम्यान:  या आरोपीकडे  अधिक तपास करता वेळी त्यांनी तुर्भे आणि कोपरखैरणे हद्दीत देखील मोबाईल स्नॅचिंग चे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीना सर्व मुद्देमाला सह वाशी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे सदर आरोपीकडून खालील नमूद एकूण 04 मोबाईल स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आले आहेत

संबंधित पोस्ट