
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाण्यात २५ सप्टेंबरला गीत गायनाचे आयोजन!..
नवी मुंबई :स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मुंबईची अग्रगण्य संस्था 'सरगम म्युझिक लॅब्स' ने एक अनोखी 'गाण्यांची मॅरेथॉन' दि.२५ सप्टेबर २०२२ ला आयोजित केली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहापासून ते रात्री दहापर्यंत असणार आहे.
यामध्ये हुन्नर असणारे चांगल्या प्रतीचे गायक बॉलीवूडची १०० लोकप्रिय हिंदी गाणी उपस्थित असलेल्या संगीत प्रेमी नागरिकांसमोर गायली जाणार आहेत.
यावेळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आपल्या कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी संगीत प्रेमी नागरिकांनी निर्वाणा एनक्लेव्ह, जैन मंदिरा समोर, २७ एकर्स कोठारी कंपाऊंड, , मानपाडा, ठाणे (प. ) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान: या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना छाया जैन व साकेत जैन यांची असून अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९३४००५४३४२/९३०३९७१२०२ क्रमांकावर संपर्क साधावा
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम